वर्धा : पालिका कर्मचाऱ्यांच्या मागणायाबाबत पाठपुराबा करूनही शासन गंभीर नसल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार 5 एप्रिलला वर्धा नगर परिषद कार्यालयापुढे काळी फित लावून निदर्शने करण्यात आली. शासन स्तरावर नगरपालिका तसेच नपंमधील कर्मचा-यांच्या न्याय मागण्याकरिता शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार 5 एप्रिलला काळ्या फित लावून निदर्शने, 20 एप्रिलला आझाद मैदान ते मंत्रालयावर मोर्चा 1 मे 2022 रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर सर्व आवश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन कर्मचाऱयांच्या मागण्याची पुर्तता होत नाही, तोपर्यंत सुरू राहील, याची जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदनातून म्हटले आहे.