वर्धा : भारतीय हवामान विभागाद्वारे विदर्भातील जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वर्धा जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या प्रांरभी तापमनात काही प्रमाणात घट होत तापमान 42.4 अंशावर स्थिरावले. असे असले तरी नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याची गरज आहे. जिल्ह्याचे तापमान मंगळवारी 42.4 सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले होते. त्यात एका दिवसांत चार अंश सेल्सियस अंशाची वाढ होत बुधवारी 42.8 ऐवढे नोंदविल्या गेले. तर गुरुवारी 43.2 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली होती. पुन्हा शुक्रवारी 43 तर शनिवारी 42.4 अंश सेल्सियस एवढे नोंदविल्या गेले. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.