१ मोबाईल टॉवर, ८ मॉल सील! १५ मालमत्ताधारकांची नळजोडणी कापली; केवळ ८.९३ कोटींचाच कर वसूल: थकीत कराची वसुली सुरू

वर्धा : मालमत्ताधारकांसह विविध मॉल आणि मोबाईल टॉवरवर असलेल्या थकीत कराची वसुली करण्यासाठी न.प. प्रशासनाने १ जानेवारीपासून वसुली मोहीम सुरू केली. त्यानुसार २०२१-२२ मध्ये १४ कोटी ४२ लाख रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८ कोटी ९३ लाखांचा कर वसूल झाला असून, कर न भरल्याने शहरातील एक मोबाईल टॉवर, विविध भागातील आठ मॉल्स सील केले असून १५ मालमत्ताधारकांची नळजोडणी कापण्यात आल्याची माहिती आहे.

तब्बल ४० पथके तैनात करण्यात आली. आहे. शहरातील ११२ मालमत्ताधारकांकडे १ लाखाहून अधिक थकबाकी होती. अशा गाळेधारकांना लोकन्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. इतकेच नव्हे तर सुमारे १३०० गाळेधारकांना न.प.ने जप्तीच्या नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे थकित कर असलेल्यांनी कराचा भरणा तत्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here