

आर्वी : नजीकच्या नांदपूर येथे बुधवारी दुपारी १२,३० वाजता एका युवकाने थेट ग्रामपंचायतच्या अन्याया विरोधात स्वत: किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान घडल्याने अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली होती. सुरज धर्मपाल मुंदरे(3०) असे किटकनाशक प्राशन करणाऱ्या युवकाचे नाव असून त्याला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रामसेवक यांच्या जुन्या कॉर्टरच्या बाजूला सुरज धर्मपाल मुंदरे याच्या मालकीचे स्टेशनरी दुकान आहे. तसेच इतर लोकांनी देखील त्या ठिकाणी घरे बांधली आहे. ग्रामपंचायत नांदपूर प्रशासनाने शासकीय जागेवरील घरे लोकांच्या नावे करून दिली. तसेच , सुरज धर्मपाल मुंदरे यांच्या दुकानाची जागा सुद्धा तेथे घर बांधलेल्या व्यक्तींचा नावे केली. सुरज धर्मपाल मुंदरे यांना दुकान हटविण्याची नोटीस दिली. आज दुकान हटविण्याची कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी करीत असताना सुरजने अन्याय झाला असा आरोप करीत किटकनाशक प्राशन केले.