वर्धा : बनावट कंपनीच्या नावे. पॅरासिटीमॉल पावडर नसल्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त करून, वर्ध्यातील औषध विक्रेत्याला 1 लाख 26 हजार 850 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सतीश हिरासिंग चौहाण रा. महालक्ष्मी सेवाग्राम रोड, वर्धा यांनी दिलेल्या फिर्याटीवरून सुशीलकुमार एस. के. सेल्स अण्ड मार्केटिंग कंपनीचा मालक रा कानपूर. उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश चौहाण यांचे हिंगणघाट, येथे के.एसएसएम फॉर्म्युलेशन प्राली नावाचे प्रतिष्ठान आहे. त्यांना आरोपीने पाठवलेला माल हा पॅरासिटीमॉल पावडर नसल्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त केला. तसेच आरोपीने अर्जटाराकडून बँकेमार्फत 1 लाख 26 हजार 850 रुपये हेतुपुरस्सर ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर अन्न व औषधी विभागाच्या निरीक्षकांमार्फत चौकशी केली असता कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सुशीलकुमार एस. के. सेल्स अँन्ड मार्केटिंग कंपनी मालक रा. कानपूर उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.