

येरला : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महामार्ग क्रमांक सातवरील दारोडा टोलनाक्याजवळ घडली. महामार्ग क्रमांक 7 वरील दारोडा टोलनाक्याजवळ पांडुरंग हुलके (वय 65) हे पायदळ आपल्या गावी जात होते.
पांडुरंग हुलके हे दारोडा गावावरून बाजूच्या शेतात पायदळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघात घडताच गाडीचालक फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास वडनेरचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे करीत आहेत. अपघात घडविणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे.