

सिंदी रेल्वे : परम पुज्य संत सदगुरु माताजी गौरीशंकर महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार (ता. २३) ते बुधवार (ता. ३०) भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन विवीध कार्यक्रमाची सप्ताहभर पर्वनी राहणार आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी भागवत कथाकार ज्ञानेशकन्या सुश्री कल्पणाताई महाराज आणि संच यांच्या मधुर वाणीतुन संगीतमय भागवत कथेचा कार्यक्रम सुरु असुन दररोज पहाटेला काकड आरती, सकाळ संध्याकाळ महाआरती हरीपाठ आणि भजनाचा कार्यक्रम सुरु आहे.
तत्पुर्वी बुधवारी ता. २३ ला पहाटे समाधी स्थळी अभिषेक होमहवन आणि आरतीचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
बुधवार ता. ३० ला महासमाधी दिन म्हणून सकाळी १० वाजता महाआरती झाल्या नंतर माताजी निवासस्थान श्री लक्ष्मीनारायण मंदीर येथुन असंख्य भजन मंडळाच्या टाळमृद्यगाच्या गजरात भव्य पालखी सोहळ्याची सुरवात होणार असुन पालखी शहरातुन प्रर्दक्षना घालुन समाधी स्थळी समारोप होणार आहे. यानंतर ज्ञानेशकन्या सुश्री कल्पणाताई महाराज आणि संच गोपाल काल्याचे किर्तन सादर करणार आहेत.
यानंतर महाआरती होणार असुन लगेच भव्य महाप्रसादाला सुरवात होणार आहे. माताजी संत गौरीशंकर महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचा सर्व भावी भक्तानी सहभागी होवुन लाभ घ्यावा तसेच संस्थानच्या गौ-गौवंश रक्षणार्थ प्रकल्पाला सयोग राशी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानचे सर्वेसर्वा मुन्नाजी महाराज शुक्ला यांनी केले आहे