

वर्धा : देशामध्ये पाच राज्यातील निवडणुका असल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासूत दरवाढीचा सपाटा थांबला होता. परंतु आता निकाल लागला आणि सत्ता स्थापन होताच पुन्हा पाच महिन्यांनंतर महागाईचा भडका उडाला. आज घरणुती सिलिंडर गॅस तब्वल ५० रुपयांची महागला असून एक हजार पार गेला आहे. यासोबतच पेट्रोलच्या दरामध्येही जवळपास एक रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरसह पेट्रोलच्या दरवाढीमुळे आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ सोसावी लागणार आहे.