समुद्रपूर : पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मंगरुळ येथे पतीने पत्नीस बेदम मारहाण करून कैचीने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी 18 मार्चला घडली. जखमी मनिषा सुनिल ढोके रा. मंगरुळ हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सुनिल ढोके याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनिषा हिचा विवाह 2000 साली मंगरुळ येथील सुनिल ढोके यांचे सोबत झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून सुनील हा मनिषाला मारहाण करून त्रास देत असल्याने ती त्याच्या घरातील खोलीत आपल्या दोन मुलांना घेऊन वेगळी राहत असून कपडे शिवण्याचा व्यवसाय करुन आपले जीवन जगत आहे.
शुक्रवारी मनिषा कपडे शिवत असताना पती सुनील ढोके हा तिच्या खोलीत येऊन तु माझे घरी कशी राहते म्हणून वाद करुन शिवीगाळ करीत मनिषाला लाताबुक्कयाने छातीवर, पाठीवर डोक्यावर मारले. त्यामुळे मी खाली जमीनीवर पडली तेव्हा त्याने शिलाई मशीनवरील कैची उचलुन तिच्या उजवे हातावर वार केले या संबंधी मनिषा ढोके हिचे तक्रारीवरून गिरड पोलिस ठाण्यात पती सुनिल ढोके याचे विरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे