पत्नीला जबर मारहाण! हिंगणघाट पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : कोटुंबिक वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाकडी येथे घडली. प्राप्त माहितीनुसार 29 वर्षीय विवाहितेचा पती दुस-या महिलेसोबत अनैतिक संबंध होण्याच्या कारणावरून दोघांत नेहमीच वाद होत होता. 11 मार्च रोजी पती हा त्या महिलेला घेऊन घरी आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने त्याला विरोध केला असता आरोपी पतीने पत्नीला जबर मारहाण केली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here