वर्धा : शासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी राज्यभर कलापथक कार्यक्रमांव्दारे जनजागृती केली जात आहे. जिल्हयात 63 गावांमध्ये कलापथकाचे कार्यक्रम होणार असून भिडी येथून या कार्यक्रमास आज सुरुवात झाली. गावक-यांना त्यांच्याच बोलीभाषेत मनोरंजनाच्या माध्यमातून योजना समजावून सांगण्याचे चांगले माध्यम म्हणजे कलापथक कार्यक्रम होय. जिल्हयात 63 गावांमध्ये कलापथकाचे कार्यक्रम केले जात असून निवड समितीच्या वतीने तीन सचांची निवड करण्यात आली आहे.
हे कलापथक संच रोज तीन याप्रमाणे सात दिवस 63 गावांमध्ये योजनांचे जनजागृती कार्यक्रम सादर करतील. भिडी येथे आज कलापथकाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शासनाच्या वतीने घरकुल, शौचालय, स्वच्छता, स्वयंरोजगार, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शेतक-यासाठी औजारे, कर्जमुक्ती येाजना तसेच आरोग्य विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची जनजागृती कलापथकाती कलावंतांव्दारे केली जात आहे.
सदर कलापथक कार्यक्रम दि.15 मार्च पर्यंत चालणार असून त्या गावांमध्ये कारंजा तालुक्यातील सारवाडी, ठाणेगाव, हेटीकुंडी, कन्नमवारग्राम, बांगडापूर, नारा, पारडी, सुंसुद्रा. आष्टी तालुक्यातील तळेगाव, भारसवाडा, थार, धाडी, साहूर, वडाळा, माणिकवाडा, तारासावंगा. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी, जळगाव, देऊरवाडा, पिंपळखुटा, खरांगना, रोहणा, विरुळ, वाढोणा या गावांचा समावेश आहे.
हिंगणघाट तालुक्यात धोत्रा, आजनसरा, वडनेर, दारोडा, बोरगाव, सातेफळ, नंदोरी, वासी. समुद्रपूर तालुक्यातील कोरा, मंगरुळ, गिरड, लसनपूर, जाम, कांढळी, मांडगाव, देवळी तालुक्यातील नागझरी, सोनोरा डोह, अंदोरी, भिडी, गौळ, आगरगाव, रोहणी, विजयगोपाल. वर्धा तालुक्यातील वायगाव, वायफळ, तळेगाव (टा), खरांगना (गो), आंजी (मो), तरोडा, येळाकेळी, पवनार तर सेलू तालुक्यात केळझर, सेलडोह, सिंदी, हिंगणी, दहेगाव, सुकळी(स्टे), चानकी, हमदापूर येथे कलापथकांव्दारे जनजागृती कार्यक्रम होणार आहे.