वर्धा : कोविडमुळे स्कुल बस व वाहनाच्या मालकांना दिलासा देण्यासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील शालेय प्राधिकरणाच्या मालकीच्या व कंत्राटी पध्दतीवर घेतलेल्या स्कुल बस आणि केवळ स्कुल बस म्हणुन वापरण्यात येणा-या बसेस तसेच केवळ शाळेतील मुलांची ने-आण करण्यासाठी शालेय प्राधिकरणाव्यतिरिक्त इतरांची मालकी असलेल्या किंवा कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या स्कुलबसच्या करात 100 टक्के करमाफी देण्यात आलेली आहे. सदर स्कुल वाहनधारकांनी सदर कालावधितील स्कुल बसच्या कराचा भरणा करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत शासनाने 1 डिसेंबर 2021 पासुन वाहन चालकांनी वाहन चालवितांना केलेल्या गुन्हयाच्या दंडात वाढ करण्यात आली असून नविन दंड आकारणी याप्रमाणे आहे. वाहनाचा विमा नसणे 4 हजार रुपये, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नसणे 9 हजार रुपये, वाहनाचा परवाणा नसणे 20 हजार रुपये, विना परवाना वाहन चालविणे 10 हजार रुपये, वाहनाची पियुसी नसणे दुचाकी व तिनचाकी वाहनासाठी 2 हजार रुपये व इतर वाहनासाठी 4 हजार रुपये, वाहन चालवितांना हेल्मेट न घालने 1 हजार रुपये तसेच वाहन चालविण्याचा परवाना 3 महिन्यासाठी निलंबित, वाहन चालवितांना सिट बेल्ट न लावणे 200 रुपये, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे दुचाकी व तीन चाकीसाठी 2 हजार रुपये तसेच वाहन परवाणा तीन महिन्याकरीता निलंबित, हलके मोटार वाहणासाठी 4 हजार रुपये व जड मोटार वाहनासाठी 10 हजार रुपये, मोटार सायकलवर तीन व्यक्ती बसविणे 2 हजार रुपये, वाहने वेगाने किंवा शर्यंतीने चालविणे 10 हजार रुपये, अवैध प्रवाशांची वाहतुक करणे 20 हजार रुपये, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे 2 हजार रुपये, परवान्यापेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतुक करणे जादा प्रति विद्यार्थी 400 रुपये नविन दंड आकारण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.