वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथे चार मित्र पिपरी येथून पोहायला आले असता पोहताना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले तर दोघे जण पाण्याच्या बाहेर कसेबसे निघाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सायंकाळच्या सुमारास पिपरी येथून ऋतिक नरेश पोखळे, संघर्ष चंदू लढे, रणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधाकर लढे हे चारही मित्र गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरा येथे वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते यादरम्यान नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुचकड्या खात असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यात घाबरेलले दोघे जण कसेबसे नदीपात्रातून बाहेर पडले. त्यावेळी त्याचे दोघे मित्रा ऋतिक पोखळे वय 21 आणि संघर्ष लढे वय 18 वर्ष दोघेही पाण्यात बुडाले. यादरम्यान त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. यात दोघेही बेपत्ता झाले आहे. दोघांचाही शोधकार्य सुरू केले आहे.
त्यांच्यासोबत असलेले रणजित धाबर्डे व शुभम लढे हे बचावले आहे. या घटनेची वडणेर पोलिसांना माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दोघांचा शोधकार्य सुरू असताना रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून बेपत्ता युवकाचा उद्या सकाळी शोधकार्य सुरू होणार आहे. दोन्ही युवक नदीपात्रात बुडल्याने पिपरी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.