
मुंबई : राज्यातील काही भागात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, तर काही भागांत तापमानात वाढ झाली आहे. येत्या चार दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून महाराष्ट्रासह गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात वादळ, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यात पाऊस –
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पावासाची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्ह्यांत मध्यम ते हलका पाऊस कोसळेल. तसेच नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यासह विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळासह मुसळधार पावासाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.