वर्धा : माझ्या मुलीशी का बरं बोयतोय, या कारणातून वाद करीत महाविद्यालयीन युवकाला चांगलीच मारहाण केली. ही घटना नागठाणा रस्त्यार असलेल्या एका पॉलिटेक्निक महविद्यालया समोरील रस्त्यावर २३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने काही वेळ परिसरातील नागरिकांनी जर्दी केली होती. हेमंत महादेव ईवनाथे, रा. शास्त्रीनगर वॉर्ड, पुलगाव हा एका २० वर्षीय युवतीसोबत बोलत असताना आरोपी अंकित विश्वकर्मा, रा. सिंदी मेघे याने याची माहिती आरोपी मनीष सुभाष डंभारे याला दिली.
दरम्यान संतापलेला मनीष आणि अंकीत हे दोघे बायपास रस्त्यावर गेले आणि हेमंत ईवनाथे याला तू माझ्या मुलीसोबत का बोलत आहे, असे म्हणत वाद करून रोडने मारहाण केली. तसेच अंकीतने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. हेमंतने याबाबतची तक्रार सावंगी पोलिसांत दाखल केली. युवती घरी जात असताना हेमंत ईवनाथे याने तिचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना २३ रोजी घडल्याने युवतीने सावंगी पोलिसांत तक्रार दिली. यावरुन हेमंतविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.