राज्य आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांच्या हस्ते मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन

वर्धा : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वर्धा कार्यालयामध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुबंईचे प्रभारी अध्यक्ष डॉ. एस.के. काकडे यांचे हस्ते मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बार असोशिएनचे अध्यक्ष एम.पी धृव, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष किशोर पोटे, जिल्हा ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्यक्ष पी.आर.पाटील, सदस्य एम.आर.खनके, प्रबंधक अ.प्र. देशमुख यांची उपस्थिती होती. मध्यस्थी कक्षामुळे आयोगातील प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यास मदत होणार असल्याचे उदघाटन प्रसंगी श्री. काकडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला वकील वर्ग तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here