हिंगणघाट : लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय आतेभावानेच त्याच्या बहिणीवर अत्याचार करून पीडितेला तीन महिन्याची गर्भवती बनविल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पुढे आली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी ही घरी एकटी असताना तिचा आतेभावाने घरात प्रवेश करून लग्नाचे आमिष देत तिचे बळजबरी लैंगिक शोषण केले. सुमारे दोन ते तीन महिने हा प्रकार सुरू होता. अखेर पीडितेची प्रकृती बिघडल्याने घरच्यांनी तिला खासगी रुणालयात तपासणीसाठी घेऊन गेले असता पीडिता ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. दरम्यान, पीडितेने याबाबत हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Home ◼️ संपादकीय आतेभावाकडून १५ वर्षीय बहिणीचे लैंगिक शोषण! गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस; पोलिसात तक्रार...