वर्धा : भुगाव येथील इंद्रजित पॉवर प्लॅन्टमधील कामगारांनी एकत्र येत बुधवारी कामबंद आंदोलन करून कंपनीसमोर ठिय्या दिला. आश्वासन नकोच, वेतनवाढ द्या, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.मागील अकरा महिन्यांपासून वेतन वाढविण्यात येईल असे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून कामगारांना देण्यात येत आहे. परंतु. प्रत्यक्ष कुठलीही कार्यवाही न झाल्याने तोकड्या वेतनावर कामगारांना राबवून घेतले जात आहे. कष्टकरी कामगारांचे वेतन वाढविण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
आंदोलनात मोहन भोयर, प्रवीण हेमने, गजानन वाघमारे, दीपक कुडमते, रत्नाकर काळे, प्रदीप नगराळे, अतुल गारसे, वसंत राऊत, पंकज धनवीज, जयदीप जगनाडे, किशोर सरोदे, विजय राऊत, मिलिंद येसणकार, प्रविण भोयर, रामू येसणकार, दुर्गेश मेहता, अनिल कांबळे, संदीप कुलसंगे, अमोल निंदेकर, सचिन गेदाम, महेश जगताप, नाना अढाऊ, सतीश उमाटे, सुरेश लोखंडे, अविनाश शास्त्रकार आदी सहभागी झाले होते. बुधवारी सायंकाळी कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी कंपनी प्रशासनाने कंपनी परिसरातील विद्युत पथदिवे बंद केले. त्यामुळे कामगारांना काळोखातच आंदोलन करावे लागले.