वर्धा : राज्य शासन शेतकरी हिताच्या विविध योजना राबवित आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृध्द झाला पाहिजे हे ध्येय ठेऊन काम केले जात आहे. महाकाळ येथील 80 टक्के शेतकरी ऊस उत्पादन घेतात. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला ऊस साखर कारखाण्यास नेण्यास रस्ता खराब असल्याने एक महिन्याचा विलंब होतो. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी महाकाळ ते सुरगाव रस्ता एक महिन्यात पूर्ण करुन देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुनील केदार यांनी महाकाळ येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात दिली.
महाकाळ येथे येळाकेळी रस्ता बांधकाम, शाळेची संरक्षण भिंत, पांदन रस्ता, सभागृह अशा दिड कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार रणजित काबंळे, मनोज चांदूरकर, जिल्हा परिषद सदस्य अर्चना टोनपे, ज्योती निकम, पंचायत समिती सदस्य अमित गावंडे, महाकाळचे सरपंच सुरज गोह, पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम टोनपे, प्रमोद लाडे, मंगेश राऊत, सुमित्रा मडकाम, बाळा जगताप आदी उपस्थित होते.
जिल्हयातील एकही व्यक्ती राशनकार्ड, जातप्रमाणपत्र, घरकुल पट्टे यापासून वंचित राहणार यासाठी. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करुन शिबिराचे आयोजन करुन हे या गोष्टी उपलब्ध करुन घ्यावे, यासाठी शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. जलजिवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात हॅन्ड पंप रिचार्ज व इतर पाण्याच्या स्त्रोताची कामे घेण्यात येत असून यामुळे ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे पालकमंत्री सूनील केदार म्हणाले.
ग्रामपंचायतीतील पथ दिव्यांच्या विजेची देयके पुर्वी जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात येत होती. परंतु आता शासनाने सदर देयके ग्रामपंचायतींनी भरावे, असे आदेश काढल्यामुळे ग्रामपंचायतींवर विज देयकांचा मोठा भार पडत आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी प्राप्त होणा-या 15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधून सोलर पॅनल बसवून ग्रामपंचायतीसाठी विज पुरवठा करावा. यामुळे विज देयके भरण्याची समस्या निकाली निघेल, असे रणजित काबंळे म्हणाले.
.