पवनार : येथील महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी यात्रेचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्शवभुमीवर जिल्ह्यात जमावबंदी लागु असल्याने यात्रा रद्द करण्यात आली. मात्र याची माहिती साहित्य विक्रीकरीता बाहेर जिल्ह्यातून यणार्या व्यवसायिकांना नसल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीकरीता आनले होते मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागल्याने व्यावसायिकांमध्ये यावेळी नाराजी दिसून आली.
महात्मा गांधी यांची ३० जानेवारी रोजी हत्त्या झाली त्यानंतर भुदान चळवळीचे प्रनेते आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व सर्वोदयी कार्यकर्ते पवनार येथील ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात एकत्र आले. महात्मा गांधींच्या हत्त्तेच्या तेराव्या दिवशी १२ फेब्रुवारीला धाम नदीपात्रात त्यांच्या अस्ती विसर्जीत करण्यात आल्या. गांधींच्या हत्तेनंतर सर्वोदयी कार्यकर्ते विनोबा भावे यांच्याकडे आशेने पाहु लागले होते. त्यांच्या नेतृत्वात ऐकत्रीत येत ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात दरवर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. त्यानंतर दरवर्षी देशभरातील शेकडो सर्वोदयी कार्यकर्ते महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरीता ऐकत्रीत येत होते. कालांतराने गावातील व परिसरातील नागरीकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
गेल्या अनेक वर्षापासुन पवनार येथे भरणार्या यात्रेत मागील वर्षीपासून कोरोनामुळे विग्न आले आहे. या यात्रेकरीता दुरवरुन अनेक नागरीक येथे येतात मात्र यात्रा भरनार नसल्याची कोणतीच कल्पना नसल्याने यात्रेचा आनंद लुटन्याकरीता शेकडो नागरीक याठीकाणी येत आल्यापावली परत गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
पवनार हे गाव आचार्य विनोबा भावे यांची कर्मभुमी येथे दरवर्षी हजारोच्या संखेने १२ फेब्रुवारीला यात्रेकरु येतात. या दिवशी पवनार गावात आनंदाचे वातावरण असते या यात्रेत नागपूर, वर्धा, सेलू, केळझर, देवळी अशा अनेक गावातून छोटे- मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय थाटतात दुरवरुन आनेक नागरीक येत या यात्रेत सहभागी होतात, मात्र यावर्षी यात्रा रद्द झाल्याने बाहेर गावातून आलेल्या व्यवसायिकांना आल्या पावली परत जावे लागले, यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.