वर्धा : प्रा. अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी (ता. १०) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बुधवारी (ता. ९) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले होते. देशभरात गाजलेल्या या प्रकरणाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा होती. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १० फेब्रुवारीला नागपुरात उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता. आजच तिला न्याय मिळाला आहे.