

वर्धा : चालकाने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून दिशादर्शक फळकाला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात इनोवा गाडीमधील आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना कारंजा ते अमराbती महामार्गावरील तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील नवीन पुलावर घडली. चालक कुणाल अनिलकुमार गुप्ता (35) रा. नागपूर हा कार क्रमांक एम.एच. 31 सीआर 5620 या कारमध्ये आठ जणांना घेऊन निघाला. गाडी भरधाव वेगात चालवून दिशादर्शक फलकाला गाडी धडकली.
या अपघातात विनोद श्रीराम धुर्वे (42) रा. मैयतानगर ता. कटोनी मध्य प्रदेश, पनम विनोद धर्वे (42) रा. मैयतानगर मद्य प्रदेश, गिरजाबाई सरदार नागरे (55), मणीबाई प्रेमलाल कुरसाम (60), उर्मिला अनिल धुर्वे (42), वर्षा सुनील सहारे (42), विशाखा वसंतराव मस्के (60),रा. कळमणा नागपूर, शालू प्रवीण शाहळे (30) रा. तुमसर हे आठ जण जखमी झाले आहेत.