चिकणी (जामनी) : स्टीलच्या दरात विक्रमी तेजी आली आहे. तसेच इतर बांधकाम साहित्याचे दरही वाढले असल्याने स्वप्नातील हक्काचे घर आता दिवास्वप्न ठरू पाहात आहे. अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलं महागाईमुळे अर्ध्यावर येऊन थांबली आहेत. इतकेच नव्हे तर गवंडी कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्ष प्रश्न कामगारांपुढे पडला आहे. स्टीलसह विटा, गिट्टी, वाळू, सिमेंट लाकूड, प्लाय, काच आदी वस्तूंचे भाव चांगलेच वाढले आहे.
स्टील ६१ हजारांवर
यांधकाम साहित्यातील महत्त्वाचा घटक म्हणून स्टीलचा (लोहा) वापर केला जातो. पण, हल्ली याचे भाव गगनाला भिडल्याते ग्राहक चिंतेत असल्याचे दिसून येते. हल्ली बाजारपेठेत लोहा ६ हजार १०० रुपये प्रतिक्विटल आहे.