

वर्धा : बजाज फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीच्या सततच्या धमक्यामुळे महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी 27 जानेवारी रोजी शहरातील हवालदापुरा भागात घडली. महिलेची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महत्वाचे असे की, या महिलेने कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी संबंधित प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी ज्योत्स्ना प्रकाश देशमुख यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची परतफेड वेळेवर भरू शकल्या नाही. कंपनीच्या वसुली प्रतिनिधीकडून त्यांना सतत बोलावले जात होते. त्यामुळे ज्योत्स्ना हिने तिची मैत्रिण छाया राजेंद्र श्रीवास (55) रा. हवालदारपुरा हिला या संदर्भात माहिती दिली. आणि थकबाकीच्या हतप्त्यासंदर्भात कंपनीच्या वसुली प्रतिनिधीशी कुठे बोलायचे. मैत्रिणीला सहकार्य करण्याच्या उहेशाने छाया कंपनीच्या रिकव्हरी प्रतिनिधीशी बोलली. मी स्वतः ज्योत्स्नाचा थकीत हप्ता कुठून भरणार? छायाला हप्ता भरण्यासाठी पैसे उभे करता आले नाहोत. त्यामुळे कंपनीचे प्रतिनिधी अक्षय भागवत यांनी छाया यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली.
मात्र, छायाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने कंपनीचे प्रतिनिधी भागवत याने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. यामुळे वैतागलेल्या छाया यांनी 26 जानेवारीला विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. छाया श्रीवास यांच्यावर सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.