वर्धा : 43 प्रवासी घेऊन नागपूरकडे रवाना झाली बस क्रमांक एमएच 40 एन 9995 एसटी बस ही नागपूर हायवेवर येताच मामा भांजा दर्ग्याजवळ येताच अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना गुरुवार (ता. २७) ४ वाजताच्या सुमारास घडली.
बसचे ब्रेक फेल झाल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात येताच ड्रायव्हरने बसवर ताबा मिळवत हायवेच्या साईडला सुरक्षितपणे उभी केली. जर बस हायवेवर वेगाने धावत असतांना ब्रेक फेल झाले असते तर 43 प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता ड्रायव्हरच्या सुचकतेने सदर घडणारी मोठी घटना टळली.
त्यानंतर वर्धा डेपोतून दुसरी बस बोलवण्यात आली. सदर दुसरी बस येई पर्यंत काही प्रवाशी मिळेल त्या वाहनाने निघून गेले व काही प्रवाश्यांना एसटी महामंडळच्या दुसऱ्या बसने नागपूरकडे रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाश्यांनी ड्रायव्हरचे कौतुक केले.