वर्धा : लग्न होऊन चार वर्षे झाली तेव्हापासून सासरच्या मंडळीनी माहेरून पैसे घेऊन ये, म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 21 जानेवारी रोजी मौजा जरुड येथून उजेडात आली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी हर्षाली राहूल दारोकर (वय 25) रा. तारासावंगा ता. आष्टी हिचे अमरावती जिल्ह्यातील मौजा जरूड येथील राहुल दारोकर याच्यासोबत 16 मे 2017 हिंदु रिती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. काही महिने सुखाचा संसार झाला. पण, त्यानंतर पतीसह सासरच्या मंडळीकडून माहेरून पैसे घेऊन ये, म्हणत वारंवार शारिरिक व मानसिक त्रास देण्यात येत आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.