वर्धा : सन २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्ह्यातील ३२ वाळूघाटांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन निविदा सादर कराव्यात, असे आवाहन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लिलाव होणाऱ्या घाटांमध्ये देवळी तालुक्यातील आपटी, हिवरा, टाकळी, सोनेगाव बाई, टाकळी चना आर्वी तालुक्यातील दिघी, वडगाव व सायखेडा, समुद्रपूर तालुक्यातील शिवणी, सेवा, चाकूर, मनगाव, मेनखात, मांडगाव, पारडी, औरंगपूर, उमरा, बरबडी व हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दा), चिकमोह, टेंभा, पारडी, चिंचोली बु, खारडी, भारडी, काजळसरा, गणेशपूर, बोरखेडी, भगवा, शेकापूर बाई, नांदरा, धोची, हिवरा व सोनेगाव (धोची) या गावातील ३२ वाळूघाटांचा लिलाव ३१ जानेवारी रोजी होणार आहे.
यासाठी १८ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असून, २५ जानेवारी रोजी ऑनलाइन नोंदणी पद्धत बंद होणार आहे. १८ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने निविदा स्वीकारण्यात येणार आहे. २८ जानेवारी रोजीपासून अर्ज स्वीकारणे बंद होऊन ३१ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकार्यांनी कळविले आहे.