सेलु : तालुक्यातील झडशी येथील सेंट्रल बँकेत मनमानी कारभाराने कळस गाठला असून, शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्जाच्या वसुलीकरिता चक्क बँकेत असलेले खातेच लॉक करण्यात आले आहे. यावर्षी सुरवातीपासूनच शेतकरी नापिकीने त्रस्त असून कपाशीचे उत्पन्न नगण्य राहिले. शेतकर्यांचा कापूस बाजारात गेल्यानंतर कापसाचे भाव वाढले. सोयाबीन असमाधानकारक राहिले, तूर पीक अंतिम टप्प्यात असताना अकाळी पावसाने तूर पीक उत्पादक शेतक-यांचे कंमरडे मोडले आहे.
झडशी येथील सेंट्रल बँकेत सेव्हींग खाते असणा-या शेतक-यांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. या बँकेत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, यत्पादक शेतक-यांचे चुकारा आदी विविध प्रकारचे खाते आहेत. सध्या शेतक-यांकडील कर्ज वसुलीकरिता ह्या खात्यांना लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे दैंनदिंन व्यवहार ठप्प झाले आहेत.
दर आठवड्याने येणारा दुकाचा चुकारा, म्हणून येणारी दोन हजारांची मदत, विम्याची रक्कम सर्व लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून मदत मिळत असली तरी बँकेने वंचित ठेवले आहे. व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्ज वसुलीसाठी असे फंडे वापरावे लागत असतात. या बाबत मला माहित नाही परंतु दोन दिवसात सुरळीत करतो, असे सांगितले.