वर्धा : गेल्या 6 वर्षांपासून थकीत करावर प्रतिमाह 2 टक्के दंड वसूल केल्या जातो. वर्ष भर जर कर भरला नाही तर 36 टक्के दंड भरावा लागतो. हा वर्धा न.प.चा सावकारी प्रकार आहे. नपने थकीत करावर 2 टक्के दंड माफ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने न.प.मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
बँकेतदेखील एवढे व्याज होत नाही. वर्धा सोडून कुठे ही हा दंड प्रकार नाही मग जनतेनी हा दंड का सोसावा? हा मुद्दा चा विषय आहे. कोरोना काळ सुरु आहे. नागरिकांजववळ रोजगार नाही. आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. याच जनतेनी कोरोना काळात गरिब जनतेची मदत केली तेव्हा या काळात न.प.प्रशासन यांनी दंड माफ करावा. तसेच न.प.चे खाली गाळे हॉकर प्लाझा, ठाकरे मार्केट, इंदिरा मार्केट रामनगर मार्केट यांचा लिलाव करुन बेरोजगार युवकांना भाडे तत्वांवर देण्यात यावे.
गटार योजनेतील रोड तात्काळ दुरूस्त झाले पाहिजे, या सदर मागण्या घेवून आम आदमी पार्टी वर्धा च्या वतीने निवेदन न.प.मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी चर्चा करण्यात आली. अधिकारी यांनी समस्या सोडविण्यासाठी कटिबध्य आहे, असे सांगितले. यावेळी जिल्हा आप प्रमुख प्रमोद भोमले प्रमोद भोयर, प्रदीप न्हल्ले, प्रकाश डोडानी, जयंत विरूळकर ,रवि येन्डे ,मंगेश शेंडे, पंकज राऊत आदी उपस्थित होती.