वर्धा : बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन,अतिवृष्टी व गारपिटीमुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील शेतमालाची अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, तुर, गहू, चना, व फळबागा उध्वस्त झालेल्या आहे. त्याच प्रमाणे इतरही तालुक्यातील पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्याची शासकीय अधिकाऱ्या मार्फत चौकशी करून त्याची दखल घेण्यात यावी. नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्यात यावी. अशी मागणी बसपाच्या शिष्टमंडळाने केली.जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्वात व प्रदेश प्रभारी ॲड.सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनात खालील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, पीक कर्ज माफ करा व शेतकरी कर्ज मुक्त करा, पिकाचे नुकसानीचे प्रमाणात नुकसान भरपाई दया, सतत दोन वर्षापासून शेती संकटात सापडली आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्या, पुढील वर्षाच्या हंगामाकरिता वीज भांडवल शेतकऱ्यांना उपल्ब्ध करून देण्यात यावे. सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी संबंधित असून त्यांना तात्काळ स्वरूपात आर्थिक मोबदला देऊन न्याय देण्यात यावा. न्याय न मिळाल्यास बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. असा इशारा देण्यात आला.
निवेदन देते वेळी जिल्हा महासचिव अनोमदर्षी भैसारे, जिल्हा सचिव सुनील भगत, दीपक भगत, जिल्हा संघटन मंत्री दिनेश वाणी, विजय ढोबळे, सुनील देशमुख, ॲड.अभिषेक रामटेके, मनोज माहोरे, पुरुषोत्तम लोहकरे, सुधाकर जून घरे, सिद्धार्थ ढेपे, अरविंद पाटील, गोलू रंगारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.