वर्धा : जिल्हा वार्षीक योजनेतून जिल्हयाच्या विकासाची कामे होत असतात. यंत्रणांकडून या योजनेतून मंजूर निधी वेळीच खर्च न केल्यास जिल्हयाचे नुकसान होते. त्यामुळे विभागांनी त्यांना मंजूर निधी तातडीने खर्च करावा. मंजूर निधी समर्पीत होणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार रामदास आंबटकर, आ. रणजित काबंळे, आ.पंकज भोयर, दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.