चार रेशनदुकानांचा परवाना रद्द! गैरव्यवहार करणाऱ्यांना तहसीलदारांचा दनका

सिंदी (रेल्वे) : येथील दोन व तालुक्यातील एकूण चार स्वस्त धान्य दुकानांत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे दिसून आल्याने त्या दुकानांचा परवाना तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी रद्द केला. पंतप्रधान योजना व राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब जनतेला देण्यात येणाऱ्या धान्यात पाच ते 12 क्विंटलची तफावत चौकशी पथकाला दिसून आली होती. परिणामी, येथील खरेदी- विक्री सहकारी संस्थेच्या दुकान क्र.3 चा तत्कालीन विक्रेता वामन शंकरराव ढोक यांच्या कालावधीतच मोठूया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे वामन ढोक यांनीच या गैरव्यवहाराची तक्रार तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे केल्याचे समजते. त्याशिवाय विजय ग्राहक संस्थेचे सुधीर झिलपे या रेशन विक्रेता दुकानाचा परवाना तहसीलदार महेंद्र सर्यवंशी यांनी एका आदेशान्वये रद्द केला. चार दिवसांपूर्वी खविसंच्या दुकानाचा ताबा सतीश भावरकर यांना तर विजय सहकारी संस्थेच्या दकानाचा परवाना सुनील हिंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी या दोन्ही दुकानांतून रेशनचे वाटप सुरू झाले.

पहिल्या आठवडयात रेशनसाठी नागरिकांना पायपीट करावी लागली, पण कोणीच काही सांगत नव्हते, हे विशेष. तालुक्‍यातील अनेक ठिकाणी असलेल्या रेशन दुकानातून पंतप्रधान योजनेचे धान्य वितरण करणाऱ्या सहकारी संस्था व खाजगी दुकानदारांना घसघशीत कमिशन मिळते. परंतु, दुकानातील विक्रेता कुटुंबातील लाभार्थ्यांच्या वयाचा घोळ करून धान्याचे वाटप करते. अल्पवयीन लाभार्थ्यांच्या नावावर वितरणाच्या नोंदवहीत जेष्ठ नागरिकांच्या नावाने रेशन वाटले असे दाखविल्या जाते. बिल देताना सरसकट आकारणी केली जाते. परंतु, अल्पवयीन लाभार्थ्यांचे अतिरिक्त धान्य लपविले जाते. उपरोक्त कारवाईमुळे सहकारी संस्थांना दरमहा किमान एक लाख रुपयाचा फटका बसला आहे, हे येथे उल्लेखनीय. शेतकी सहकारी खरेदी-विक्री संस्थेचे नवनिर्वाचित संचालक या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here