आर्वी : कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता नगरपालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकरिता मोहीम राबवून कारवाई सुरू केली. नगरपालिका पधकाने बाजारपेठेतील व्यापारी, ग्राहक व विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये याप्रमाणे दंड आकारून 12 हजार 400 रुपये दंड वसूल केला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असतानाही शहरात अनेक नागरिक बाजारपेठ व सस्त्याने बिनधास्तपणे विना मास्क फिरताना आढळतात. हे लोक स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत असल्यामुळे नगरपालिकेद्वारे मागील काही दिवसांपासून बाजारपेठ व रस्त्याने विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेतंर्गत आतापर्यंत विनामास्क फिरणारे तसेच ग्राहक व दुकानदारांकडून 12 हजार 400 रु. दंड वसुल केला या मोहिमेमध्ये उपमुख्य अधिकारी रणजित पवार, साकेत राऊत, अरुण पंड्या, संजय अंभोरे, बंग, जे.ई निकाजु, सुनील आरिकर, सुरेंद्र चोचमकार, शांतनु भांडारकर, पीडियार, जडित, ढोबळे, संतोष गजभिये, रुपेश माळोदे, बोकडे, सोनवाल, ममता अवसरे, रणजीत गोयल राजेंद्र पोकळे, हरीश बरारा, शिवा चिमोटेख, देवेंद गोडबोळे, सर्व नगरपालिका विभाग प्रमुख पुरुष व महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला.