

पुलगाव : पुलगाव-आर्वी रोडला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी जुना पुलगाव रेल्वेलाइन जवळच्या जमिनीवरील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटविले आहे. त्यामुळे ५० वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या लोकांची घरे जेसीबी यंत्राद्वारे हटविल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे मीराबाई पोकळे, अली बॅक्स, नजमा बी यांच्यासह अनेकांचे परिवार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने त्यांचे घरे तोडण्याआधी त्यांना विस्थापित करण्यासाठी कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे या परिवारापुढे जगावं की, मरावं ही समस्या निर्माण झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या नझुलच्या जागेवरील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सदर लोकांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे.