वर्धा : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयात बाटोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादित कालावधीसाठी स्थगित करण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
कोरोनाच्या ऑमीक्रोन व्हेरियंटमुळे रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थितची नोंदणी बायोमेट्रिक प्रणालीवर करण्यात येत असल्याने त्यामधून रोगप्रसाराचा अधिक धोका असल्याने सदर प्राणाली तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात पुरेशा बायोमेट्रिक मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर 31 जानेवारी 2022 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.