पवनार : घरची अतिशय हालाकीची परिस्थिती आणि आजरपण याला कंटाळून येथील वार्ड क्रमाक ६ मधील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार (ता. ६) ४.०० वाजताच्या दरम्यान घडली. अमोल सुनिल मुंगले वय २५ वर्षे रा. पवनार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अमोल याच्या आई-वडिलाचे काही वर्षापुर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तो त्याचा मोठा भाऊ आणि म्हातारी आजी राहत होते. मोठा भाऊ ह्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने तो सतत आजारी राहत होता त्यामुळे याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली होती.
अमोल याला मिरगीचा आजार होता त्यामुळे कोणत्याही कामावर तो जाऊ शकत नव्हता त्यामुळे घरी आजीला मिळनार्या निराधारच्या पैशात कसेबसे दोन वेळच्या जेवनाच भागत होत मात्र काही दिवसापासुन तो कामाच्या शोधात असल्याचे काही मित्र सांगत होते मात्र त्याला काम मिळाले नाही या विवंचनेतून त्याने मद्य प्राशन करुन येथील विहिरीत उडी घेतली.
काही युवकांना माहिती मिळताच त्यांनी त्यांनी दोर टाकुन वाचविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत विहीरीत असलेल्या झालाच्या मुळीला अमोलने पकडून ठेवले होते मात्र बाहेरुन मदत मिळायच्या आतच या झाडाची फांदी तुटली आणि अमोल विहरीतील खोल पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहरीत गळ सोडून शोध घेने चालू केला मात्र वृत्त लिहेस्तोवर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल ईटेकर, शेखर चुटे, रामेश्वर नागरे, प्रभाकर ऊईके हे करीत आहे.