वर्धा : महिला सुरक्षित तर देश सुरक्षित हे ब्रीद वाक्य पुढे ठेवून राज्यभरात वीरांगणा ब्रिगेडचे जाळे पसरविण्यात येणार आहे. ठिकठिकाणी शाखा निर्माण करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर कामगारांचे हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन वीरांगणा ब्रिगेडच्या संस्थापक तसेच श्रमिक कामगार व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी केले.
संघटनेच्या माध्यमातून कामगार, महिला, गरीब आणि गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांना मानसिक, कौटुंबिक आधार देत अशांचे जीवन प्रकाशमान करण्याचा प्रयत्न आहे. बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगार बांधवांची उपेक्षा थांबवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कामगारांना शासनाच्या योजनांशिवाय त्यांना घरकुल कसे देता येईल, याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती हिंगमिरे यांनी दिली.
कोविडसारखी गंभीर महामारी पुन्हा उद्भवू नये, मात्र, अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी संघटना सज्ज असून संघटनेच्या वतीने प्रेरणादायी कार्य सदैव सुरु राहणार असल्याचेही अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले. राज्यभरात महिलांशी मोठी शक्ती उभी करुन त्यांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी वीरांगणा ब्रिगेड कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी बोलताना वीरांगणा ब्रिगेडच्या अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले.