
वर्धा : अनुदान काढण्यासाठी 9 हजार रुपयांची लाच घेणारे आष्टीचे कृषी अधिकारी सिद्धप्पा नागप्पा नर्गेडी (वय 50) आणि त्याचा सहकारी राहुल सुरेश भिवापुरे (वय 37) यांना मंगळवारी न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आष्टी तालुक्यातील खांबीत राहणाऱ्या शेतकऱ्याने आष्टी येथील राहुल भिवबापुरे याच्या मार्फत जयश्री मोटर्सकडून 7 लाख 20 हजारांना ट्रॅक्टर खरेदी केला होता.
कृषी विभागाकडून ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 1 लाख 25 रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याने कृषी विभागाकडे अर्ज केला होता. अनुदानाची रक्कम काढण्यासाठी कृषी अधिकारी नर्गेडी यांनी राहुल भिवापुरे याच्यामार्फत 15 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर नऊ हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. सोमवारी नर्गेडी व भिबापुरेहे ट्रॅक्टरची पडताळणी करण्यासाठी खंबीत येथे गेले. या दरम्यान वर्धा एसीबीच्या पथकाने त्याला 9 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.