त्या बाप-लेकाला चिरडणारे वाहन पोलिसाच्या मुलाचे! रोहणा-पिंपळखुटा मार्गावरील अपघात; प्रकरणाचा लागला छडा

वर्धा : शेतातून घरी दुचाकीने परत जात असलेल्या रोहणा येथील विजय गाणार व अविष गाणार या बाप-लेकाला भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने रोहणा-पिंपळखुटा मार्गावर चिरडून ठार केले. या प्रकरणातील आरोपी वाहन चालकाला हुडकून काढण्यात पुलगाव पोलिसांना यश आले असून आरोपी वाहन चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे असल्याचे पुढे आले आहे.

रोहणा येथील विजय गाणार व अविष गाणार हे दोघे शेतातील मिरचीचा तोडा करून दुचाकीने घरी परत जात होते. दरम्यान भरधाव असलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात विजय व अविष या दोघांचा मृत्यू झाला. ज्या परिसरात हा अपघात झाला त्याच परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली. याच सीसीटीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत आरोपी वाहनास हुडकून काढले आहे.

विजय व अविष या दोघांना चिरडणारे वाहन आर्वी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून असलेल्या प्रभाकर वाढवे यांचा मुलगा आकाश वाढवे यांच्या मालकीचे आहे. या प्रकरणातील आरोपी वाहनाला पुलगाव पोलिसांनी देवळी नजीकच्या इसापूर येथून ताब्यात घतले आहे. शिवाय वाहन चालक व मालकालाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here