
प्रेम गावंडे
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
माननीय राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ सर यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणी विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य , जिल्हा-चंद्रपुर च्या वतीने करण्यात आलेली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. प्रा. नागोराव पांचाळ सर हे सुतार , लोहार , सोनार , पाथरवट ( शिल्पी ) , तांबट ( कासार ) या विश्वकर्मा समाजाचे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात . महाराष्ट्रातील समस्त विश्वकर्मि समाजाचे समन्वय साधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला असुन त्यांचा प्रत्येक जिल्ह्यांशी दांडगा संपर्क आहे . विश्वकर्मा समाजातील मायक्रो ओबीसी मधून येणारे पांचाळ सर यांना समाजाचा चांगला अभ्यास आहे , समाजहिताची पोटतिडक आहे . याआधी त्यांनी यशस्वी आमरण उपोषणही केलेले आहे . सरकार व प्रशासनाचे समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक सामाजिक उपद्रवमूल्ये संघटनेच्या माध्यमातून करीत असतात . तसेच ओबीसी ब्रिगेडच्या माध्यमातून दुसऱ्यांदा महाराष्ट्रभर दौरा करीत, ओबीसींचा तपशीलवार अभ्यास मा. न्यायमुर्ती रोहिणी आयोगाला दिली. अशा या समाजाभिमुख, कर्तृत्वदक्ष संघर्षमयी व्यक्तिमत्वाला राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे .
या निवेदन देतांना विश्वकर्मा वंशीय समाजाचे राज्य प्रवक्ता सुनील जानवे , VVSS चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सतीश माणुसमारे , संपर्कप्रमुख अरुण भटारकर , ज्येष्ठ नागरिक आणि विश्वकर्मा पतसंस्थेचे अध्यक्ष माणिकरावजी गोहोकर , झाडे सुतार समाज घुग्घुस अध्यक्ष योगेश भांदककर , चंद्रपूर व्हीव्हीएस युवामंच अध्यक्ष विठ्ठल दुरटकर , महाराष्ट्र VVSS युवामंचचे प्रसिद्धीप्रमुख निखील जानवे , सागर गहुकर युवा मंच उपाध्यक्ष चंद्रपुर , प्रफुल्ल बोंदगुलवार , संजय चौबे उपस्थित होते .