हिंगणघाट : जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या हिंगणघाट नगर परिषद येथील अर्धवट झालेल्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीने पुन्हा नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आलाय. नगर परिषदेच्या शाळेचे कोट्यवधीच्या इमारतीचे काम अर्धवट असल्याने विरोधकांनी या लोकार्पणावरच आक्षेप घेतला आहे.
याच महिन्यात नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त होतआहे. दरम्यान मलनिस्सारण योजना, अमृत योजना, आणि शाळेच्या इमारतीच्या कोट्यवधींच्या बांधकामाचे क्रेडिट घेण्याची चढाओढ सत्ताधारी भाजप पक्षात लागली आहे. याला हिंगणघाट येथे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विरोध दर्शविला आहे. कामाच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.