कन्हान : – शहरातील प्रशासनाच्या नि ष्काळजी पणाने पहिल्या दिवसी पाच कोरोना पॉझीटिव्ह आले. पहिल्यास दुपारी, दुस-यांची प्रकृती खालावल्याने मध्यरात्री तर दुस-या दिवसी चार रूग्णा ना नागपुर ला पाठविण्यात आले. पॉझी टिव्ह रूग्णाचे घर व परिसर वेळेवर व व्यवस्थित सॅनिटाईझेशन करण्यास दिरं गाई होत असुन कन्हान हॉटस्पाट होण्या ची शक्यता नाकारता येत नाही.
कामठी शहर हॉटस्पाट होत असताना अवघ्या ४ कि मी वर असलेल्या कन्हान शहरात कामठी वरून हाथठेलेवाले,दुका नदार व नागरिकांचे बिनधास्त पणे येणे जाणे सुरू आहे. शहरात गलोगली हाथ ठेले, तीन चाकी, चार चाकी वाहणे फिरू न वस्तुची सरास विक्री सुरू आहे. महा मार्गावर फळवाले, भाजीपाला, कपडे, प्लास्टीक, पॉल, नर्सरी झाडे व छोटे मोठे इतर दुकाने लागुन व वाहने उभे करण्या स जागा नसल्याने गल्ली सारखा महामा र्ग होत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. दुकानदार मॉस्क व सुरक्षित अंतराचे पालन करित नसल्याने महामा र्गावर चांगलीच गर्दी होत आहे. दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू असुन निश्चित बंद करण्याची वेळ दिसत नाही. पावसा ळयाचे दिवस असताना सु़ध्दा फॉगींग फवारणी होत नाही. कन्हान नगरपरिषद, पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्रा चे अधिकारी एकमेकाकडे बोटे दाखवित असल्याने येथील प्रशासनाच्या कार्यप्रणा लीवर नागरिक संताप व्यकत करितआहे दि.१३ जुलैला पहिल्याच दिवसी कामठी च्या संपर्कातुन पिपरी येथे पाच व (दि.१४) दुस-या दिवसी मुंबई वरून आलेला अशोक नगर कन्हान चा ५३ वर्षीय एक रुग्ण नागपुर खाजगी दवाखान्याच्या तपासणीत मिळुन आला. पिपरीत १०० लोकांच्या रॅपेट तपासणीत पिपरीची ४२ वर्षीय महिला आढळल्याने कन्हान पिप री ला भितीचे वातावरण आहे. प्रशासन अधिकारी व जनप्रतिनीधी च्या निष्काळ जीपणाने कन्हान हॉटस्पाट होण्याची शक्यता बळावत आहे.
कन्हान नगरपरिषद, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाची ढिल आणि नि- ष्काळजी पणाने कोरोना संसर्ग रोखण्या करिता सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाय व नियम काटेकोर पणे पाळण्यात येत नसुन पायमली होत असल्याने कोरोना संसर्गाचा कन्हान ला विस्फोट हो़ण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची नागरि कात चर्चा आहे.