
वर्धा : भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक एम.एच. 32 बी. एस. 3464 ही अनियंत्रित झाल्याने पुलासमोरील दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात दुचाकीस्वार आशीष चचाने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर राजकुमार मरस्कोल्हे हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवार 8 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजताच्या दरम्यान पवनार येथील पुलावर घडली.
नागपूर जिल्ह्यातील जैताडा येथील रहिवासी आशीष ऊर्फ आशू बाबाराव चचाने (वय 29) हे त्याचा मित्र नागपूर येथील शांतीनगरातील रहिवासी राजकुमार तुळशीराम मरस्कोल्हे याच्यासोबत वर्ध्याकडे येत होते. बुधवारी रात्री 7 बाजतादरम्यान दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाला. सेवाग्राम पोलिस ठाण्याचे एरएसआय प्रकाश लसुंते, कर्मचारी सुनील पाहुल झाडे व नयन तिवारी यांनी गंभीर जखमींना त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.