वर्धा : जिल्ह्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. हे अवैध रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, काही दिवसातच अवैध व्यवसाय सुरु होत असते. आष्टी, वडनेर, दहेगाव, हिंगणघाट, तळेगाव या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत जुगार अड्यावर छापा टाकून साहित्यसह 7 जणांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी जुगार सट्टा खेळला जात असते. हे अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. आष्टी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत खलील शाह इस्माईल शहा (वय 45) रा. आठवडी बाजार, उत्तम सखाराम ठाकरे (वय 55) रा. खंबित तर वडनेर पोलिस ठाण्यात अंतर्गत जागेश्वर ऐबतराव धवणे (वय 60), रा. पोहाणा, मनोज बाबाराव मांजेकर (वय 30) रा. पिपरी व दहेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत भरत बाबाराव बावणे (वय 39) रा. कोपरा, हिंगणघाट पोलिस स्टेशन अंतर्गत शैलेश मनोहर बुरड (वय 42) रा. आदर्श नगर व तळेगाव पोलिस ठण्यांतर्गत राजू पंजाबराब धोटे (वय 60) रा. तळेगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.