

वर्धा : कोरोना संसर्गामुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदतठेवी प्रमाणपत्राचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. निशांत परमा, जिल्हा महिला व बाळ बिकास अधिकारी प्रशांत विधाते, महिला व बाल समितीचे विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, बालकल्याण अध्यक्ष सचिन आस्टिकर, कल्याणकुमार रामटेके, रमेश दडमल, समीर बेटावडकर उपस्थित होते.