सेलू : नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आज बुधवार (ता. १) अर्ज भरण्याचा पहिल्या दिवशी सेलू नरपंच्यायतीच्या निवडणुकिकरीता एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही.
या निवडणुकीत कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, बसप, वंचित, दप्तरी गट आणि सहासिक जनशक्तिच्या वतिने उमेदवार रिंगणात उतरणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकिची तयारी करत आपापले उमेदवार जाहिर केलेले आहे तर अनेकांकडे अद्याप उमेदवारच नसल्याने त्यांचा अद्यापही उमेदवार शोधत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकानी आरक्षण जाहिर झाल्याने अनेक उमेदवारांना आपला बालेकिल्ला सोडून इतर वार्डातून आपली उमेदवारी जाहिर करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर नविन आवाहन उभे राहनार आहे. यावेळी नविन तरुण उमेदवारांचीही मोठी भर पडनार आहे. त्यामुळे गणित बिघडून दिग्गजांना हादरा बसण्याची शक्यता आहे.
त्यासाठी १ ते ७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहे. ४ व ५ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर रोजी होईल. १३ डिसेबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होईल. २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.