पवनार : शेतमाल विक्रीची व्यवस्था ही शेतकऱ्याच्या फायद्याची नसून या विक्री व्यवस्थेत बदल होत नसेल तर शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे शेतकरी हा निर्माता आहे. जीवनावश्यक प्रत्येक गरज ही शेतकऱ्याने पिकविलेल्या मालातून पूर्ण होते आपण पिकविलेल्या मालावर प्रक्रिया करून अनेक उद्योजक मालामाल झाले ती कास आता शेतकऱ्याने धरणे गरजेचे असून आपण पिकविलेल्या मालावर प्रक्रिया करून तो स्वतः बाजारात विकला पाहिजे या साठी शेतकरी उत्पादक गट, बचत गट निर्माण होऊन शेतकऱ्याने उत्पादन तयार करून विकणे काळाची गरज झाली आहे.
त्यातही सेंद्रिय उत्पादनाला बाजारात चांगली मागणी असून त्या द्वारे शेतकरी आपले जीवां उंचावू शकतात असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक भोसले यांनी श्री गृह उद्यागाचे उद्घाटन प्रसंगी केले. त्यांचे समवेत तालुका कृषी अधिकारी परमेश्वर घाय तिडक, सरपंच शालिनी आडमने हे होते.
परिसरात पिकणारा कांदा, हळद,लसूण या पिकावर प्रक्रिया करून त्याची विक्री आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची मनीषा श्री गृह उद्योगाच्या संचालिका रुपाली भोयर यांनी व्यक्त केली त्या मुळे परिसरातल्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या परिसरातील अनेक शेतकरी या कार्यक्रमाला हजर होते.