

वर्धा : वर्धा- आवी मार्गावर असलेल्या पिपरी (मेघे) येथील लहान पुलाचे बांधकाम कंपनीकडून सुरु आहे. २८ नोव्हेंबर रोजी दुपारीच्या सुमारास अनियंत्रित झाल्याने दुचाकीसह तरुण पुलाच्या खड्याच्या आतमध्ये गेल्याने त्याला सळाख लागल्याने तो तरूण गंभीर जखमी झाला. तरूण नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील सुनील गाढवे हा तरुण हा सुकळी (बाई) येथे आपल्या बहिणीकडे जात होता. मात्र, वर्धेवरून निघालेल्या सुसाट दुचाकीने तो पिपरी (मेघे) जवळ पोहचला. समोर लहान पुलाचे बांधकाम गत काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र, या ठिकाणी कंत्राटदारांकडून या ठिकाणी काही अडथळा लावण्यात येत नाही. त्यामुळे दुचाकी चालक या खड्य्यात जात असते. या रस्त्यावर कल्व्हर्ट धण्याचे काम सुरू झाले आहे. त्रिवेणा कंपनी हे काम करीत आहेत.