वर्धा : जुन्या वैमनस्यातून दारूविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारूविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.