

वर्धा : काम बंद आंदोलन मागे घेत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन करूनही रापमचे ६१ रोजंदारी कर्मचारी कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. ही कारवाई रापमचे विभाग नियंत्रणक चेतन हासबनीस यांनी केली असून, शुक्रवारी चार कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली.
रापमच्या वर्धा विभागात एकूण ६१ रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. हेच कर्मचारी वारंवार विनंती करून कर्तव्यावर रूजून झाल्याने टप्प्याटप्प्याने या ६१ पैकी ५९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर शुक्रवारी उर्वरित चार कर्मचारी कर्तव्यावर रूजू न झाल्याचे कारण पुढे करून या चारही कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आंदोलनात सहभागी असलेल्या ६१ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.